यशोगाथा आणि ठळक कामगिरी

शिवसेनेची वाटचाल म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद, नेतृत्वाची दूरदृष्टी आणि जनतेच्या विश्वासाचे बळ. १९६६ पासून अनेक ऐतिहासिक टप्पे शिवसेनेने पार केले आहेत आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही वाटचाल अधिक गतिमान झाली आहे.

आकडेवारीतून दिसणारी यशोगाथा

नागरी विकास

  • ३00+ कोटींचा निधी फक्त ठाणे जिल्ह्यातील रस्ते आणि ड्रेनेज प्रकल्पांसाठी (२०२३-२४)
  • मुंबई मेट्रो लाईन २A आणि ७: दररोज २ लाखांहून अधिक प्रवासी
  • १0,000+ शिवभोजन थाळ्या रोज वितरित ३0+ शहरांमध्ये

महिला सक्षमीकरण

  • १.२५ कोटी महिलांनी “लाडकी बहिण योजना” साठी अर्ज केले (२०२४ मध्ये)
  • ₹१५०० चा निधी महिलांच्या खात्यावर थेट वर्ग

कृषी आणि ग्रामीण विकास

  • ७ लाख शेतकऱ्यांना शिवगौरव योजनेंतर्गत लाभ
  • २५ जिल्ह्यांमध्ये नवे सौर सिंचन प्रकल्प सुरू

औद्योगिक संधी

  • १४ नवीन औद्योगिक क्लस्टर्स – १.५ लाख नवीन रोजगारांची शक्यता
  • “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत ८,000+ MSME नोंदण्या

यशोगाथा

शेतीतील क्रांती - जळगाव जिल्हा

“शिवगौरव शेतकरी योजना” मुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने बी-बियाण्यांचा पुरवठा झाला. यामुळे उत्पादनात 35% वाढ झाली.

“शासनाने वेळेत मदत केली नसती, तर माझं शेत सोडावं लागलं असतं.”

– सुनील पाटील, शेतकरी

लाडकी बहिण - बुलढाणा जिल्हा

“लाडकी बहिण” योजनेमुळे एका विधवा महिलेला स्वतःचा किराणा व्यवसाय सुरू करता आला.

“या पैशातून मी मुलीला शिकवते आणि दुकान चालवते. आता कोणापुढे हात पसरावा लागत नाही.”

– कविता ताई साखरे

स्मार्ट आरोग्य - मुंबई महानगरपालिका क्षेत्र

“बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना” अंतर्गत २000 हून अधिक रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा मिळाली.

“आमच्या वडिलांना वेळेवर उपचार मिळाले, हे शिवसेनेमुळे शक्य झाले.”

– भावना कदम, मुलगी

समृद्धी महामार्ग - बदलती ग्रामीण अर्थव्यवस्था

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील १७ जिल्ह्यांमध्ये व्यापार आणि पर्यटन वाढले.

“आता आमच्या गावातही इन्व्हेस्टर्स येत आहेत. विकास आता खऱ्या अर्थाने आमच्या दारी.”

– ग्रामसेवक, शेवगाव

ही प्रत्येक यशोगाथा म्हणजे बाळासाहेबांची दूरदृष्टी, आनंद दिघे साहेबांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि एकनाथ शिंदे साहेबांचे लोकाभिमुख नेतृत्व यांचे फलित आहे.