इतिहास आणि वारसा

शिवसेना  केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची, अभिमानाची आणि जनतेच्या संघर्षाची एक सळसळती चळवळ आहे.

१९६६ साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने “मराठी माणसाला न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष निवडला. बाळासाहेबांचा रोखठोक, स्पष्टवक्तेपणा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे शिवसेना लवकरच जनतेच्या मनामनात घर करू लागली.

ठाण्याचे बाळ, जनतेचे लाडके नेते आनंद दिघे साहेब यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना निष्ठा, त्याग आणि जनतेची सेवा या मूल्यांची खरी शिकवण दिली. ठाणे आणि आसपासच्या भागांत शिवसेनेचा विस्तार आणि मजबूत पाया घालण्यात दिघे साहेबांचे योगदान अतुलनीय आहे.

आज शिवसेना मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रभावी नेतृत्वाखाली नव्या उंचीवर पोहोचली आहे. दिघे साहेबांच्या विचारांवर चालणारे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी विकासाभिमुख धोरणे, सामान्य माणसाची साथ, आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवे अध्याय लिहिले आहेत.

शिवसेनेचा प्रवास हे संघर्षाचे, सामाजिक बांधिलकीचे आणि महाराष्ट्रासाठी अखंड कार्य करण्याचे प्रतीक आहे. ही चळवळ आहे अभिमानाची, मराठी माणसाच्या हक्कांची आणि हिंदुत्वाच्या बळाची.

शिवसेना म्हणजे –