शिवसेनेचा दृष्टीकोन हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर आधारित आहे. पक्षाने नेहमीच सामान्य जनतेच्या हितासाठी आवाज उठवला आहे — मग तो मराठी माणसाचा अधिकार असो, हिंदू संस्कृतीचे रक्षण असो, वा गरिबांसाठी योजनांचा लढा असो.
आमचा विश्वास आहे की कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेशी जोडलेली सेवा हीच शिवसेनेची खरी ताकद आहे.
आज हेच मूल्य आनंद दिघे साहेबांच्या निष्ठेच्या प्रेरणेने आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाने पुढे नेत आहोत.