संस्थापक: बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक आणि मराठी जनतेचे प्रेरणास्थान. २३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळासाहेब एक प्रतिभावंत व्यंगचित्रकार, पत्रकार, आणि प्रभावी वक्ते होते. त्यांनी “मराठी माणसाला न्याय मिळवून देणे आणि हिंदुत्वाला बळ देणे” या उद्देशाने १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली.

बाळासाहेबांनी नेहमीच स्पष्ट, रोखठोक आणि बिनधास्त भूमिका घेतली. त्यांनी शिवसेनेला केवळ राजकीय पक्ष ठेवता ती एक भावनिक लाट, एक चळवळ बनवली. मराठी अस्मिता, हिंदू एकता, राष्ट्रप्रेम, आणि जनतेसाठी सततचा लढा हे त्यांचे प्रमुख मुद्दे होते.

माझा कार्यकर्ता माझ्या लेकरासारखा आहे, ही त्यांची भावना आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जिवंत आहे.