शिवसेनेची स्थापना १९६६ साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी’ केली. त्या दिवसापासून शिवसेना ही एक चळवळ, एक लढा आणि एक कार्यकर्त्यांची ताकद म्हणून उदयास आली.
एकनाथ शिंदे साहेबांनी २०२२ साली मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिवसेनेच्या कार्यपद्धतीत वेग, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता या मूल्यांची भर घातली.
ही योजना सामान्य कुटुंबांतील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.